थाई अननस फ्राईड राईस – राईस ही जेवणा मधील मेन डिश आहे. अननस हा आंबट गोड असतो त्यामुळे भाताला छान चव येते. थाय मिरच्यांनी तिखट पणा येतो. बेसिल पानांनी सुगंध येतो. बृथ पावडर व मिरी पावडर नी पण वेगळी चव येते. हा भात तुम्ही छोट्या पार्टी साठी करू शकता.
साहित्य : १ कप बासमती राईस , १/२ कप अननस स्लाईस (फ्रेश), १ टी स्पून आले पेस्ट, २ थाय हिरव्या मिरच्या, १ टी स्पून हिरवी मिरची (बारीक तुकडे), १ टे स्पून बेसिल पाने, १ टी स्पून ब्रूथ पावडर, १ टी स्पून मिरी पावडर , १ टे स्पून कांद्याची पात (चिरून), १ टे स्पून तेल, मीठ चवीनुसार
कृती : पहिल्यांदा भात बनवून घ्या. (भात मोकळा झाला पाहीजे.) अननस स्लाईस ३० मिनिटसाठी १ टे स्पून साखर टाकून ठेवा व माईक्रोवेवमध्ये २ मिनिट शिजवून घ्या.
एका कढाई मध्ये तेल गरम करून आले, थाय मिरची, बेसिलची पाने, व अननस स्लाईस टाकून २-३ मिनिट फ्राय करा. नंतर त्यामध्ये शिजवलेला भात, ब्रूथ पावडर, मिरी पावडर व मीठ टाकून मिक्स करा. कांद्याच्या पातीने डेकोरेट करा.