तिळाची बर्फी – तिळाची बर्फी [ Sesame Seeds Burfi ] हा पदार्थ महाराष्ट्रा मध्ये मकर संक्रांत ह्या सणाला करतात. ही बर्फी खवा टाकल्यामुळे छान मऊ होते. तसेच तीळ व दाण्याचा खुट करून टाकल्यास बर्फीला चांगली चवपण येते.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४० तिळाच्या वड्या
The English language version of the recipe can be seen here – Sankranti Tiachi Burfi
साहित्य
२ कप तीळ (पांढरे )
१कप दाण्याचा कुट
१०० ग्राम खवा
2 कप साखर
२ मोठे चमचे सुके खोबरे किसून
१/२ मोठा चमचा तूप
१ छोटा चमचा वेलची पावडर
कृती
तीळ खमंग भाजुन घ्यावे व त्याची जाडसर पावडर करावी. सुके खोबरे किसून ठेवावे. दाणे भाजुन त्याचा जाडसर कुट करावा. (तीळ व दाण्याचा कुट एकत्र करावा) १/२ चमचा तूप ताटाला लावून ठेवावे.
कढाई मध्ये साखर व १/२ वाटी पाणी घेवून पाक करायला ठेवावा. पाक गोळी बिंद झाला की विस्तव बंद करावा व तिळाचे मिश्रण, वेलची पावडर व खवा घालून एक जीव करावे. नंतर तूप लावलेल्या ताटात मिश्रण एक सारखे थापावे. वरतून किसलेले सुके खोबरे थापावे. थंड झाल्यावर शंकर पाळी सारख्या वड्या पाडाव्या. ह्या वड्या छान लागतात.