टोमाटो सूप हे लहान मुलांनपासून मोठ्या माणसां परंत सर्वाना आवडते. हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहे. आपण हे सूप हॉटेल मध्ये जास्त पैसे देवून आवडीने घेतो. हेच सूप आपण जर घरी बनवले तर स्वस्त , मस्त व अगदी शुद्ध बीना भेसळ बनवू शकतो.
साहित्य : २ मोठे टोमाटो, १ छोटा कांदा (बारीक चिरून), १ टी स्पून मैदा, १ टी स्पून साखर, २ टोस्ट, १ टी स्पून साय, १ टी स्पून तूप, मीठ व मिरी पावडर चवी प्रमाणे, पाणी १/४ कप.
कृती : एका भांड्यात १/४ कप पाणी व टोमाटो घेवून कुकर मध्ये २ शिट्या काढा. टोमाटो गार झाल्या वर मिक्सरमधून काढा. एका कढई मध्ये तूप गरम करून कांदा १ मिनिटे परतून घ्या. नंतर मैदा टाकून १ मिनिटे परतून घ्या, पाणी टाकून मैदा १ मिनिटे शिजू द्या. टोमाटोचा गर, साखर, मीठ व मिरी पावडर टाकून एक उकळी आणल्यावर सूप गाळून घ्या.
सूप घेताना टोस्ट चे तुकडे करून त्यावर साय टाकून घ्या.