बटाट्याच्या किसाच्या करंज्या: बटाट्याच्या करंज्या ह्या नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर बनवायला छान आहेत. लहान मुलांना ह्या करंज्या खूप आवडतील. बटाट्याच्या करंज्या बनवतांना बटाटे अर्धवट उकडून, किसून, छान कुरकुरीत तळून घेतले आहेत. बटाटे किसताना किसणीला तेलाचा हात लाऊन मग किसावे. ह्या मध्ये भाजलेले शेगदाणे, कोथबीर वापरली आहे त्यामुळे ह्याची चव खूप छान लागते. पण ह्या करंज्या लगेच खायच्या असतात.
This English language version of this Potato Karanji preparation method and recipe can be seen here- Shredded Potato Karanji
बनवण्यासाठी वेळ: ६०
वाढणी: २० करंज्या
साहित्य: सारणासाठी:
५ बटाटे (मोठ्या आकाराचे)
१ कप शेंगदाणे
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ कप कोथबीर (चिरून)
मीठ व साखर चवीने
तेल करंज्या तळण्यासाठी
आवरणासाठी:
३ कप बेसन
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
कृती:
आवरणासाठी: बटाटे अर्धवट उकडून, सोलून, किसून घ्या. शेंगदाणे भाजून घ्या. कोथंबीर धुऊन बारीक चिरून घ्या. मग कढईमधे तेल गरम करून बटाट्याचा कीस छान कुरकुरीत गुलाबी रंगावर तळून घ्या.
तळलेला बटाट्याच्या कीस, चिरलेली कोथबीर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, साखर घालून मिक्स करून सारण तयार करून घ्या.
बेसन, लाल मिरची पावडर, गरम तेल, मीठ घालून मिक्स करून घेऊन थोडे पाणी वापरून पीठ घट्ट मळून घ्या. मळलेल्या पीठाचे एक सारखे २० गोळे बनवा.
बेसनचा एक गोळा घेवून पुरी सारखा लाटावा व त्यामध्ये एक टे स्पून बटाट्याचे सारण ठेऊन पुरी मुडपून घेवून करंजीचा आकार द्यावा. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून करंज्या छान कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम करंज्या टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.