कोलंबीची रसगोळ्याची आमटी ही कोकणा मध्ये खूप प्रसिद्ध आहे. सारस्वत लोकांची ही अगदी आवडती आमटी आहे. ती गरम गरम भातावर किंवा तांदळ्याच्या भाकरी बरोबर अगदी चवीस्ट लागते. नारळाच्या दुधाने तर अजूनच चव येते. Similar Konkani Prawn Preparation, can be seen – Here.
साहित्य : ५०० ग्राम पांढरी कोलंबी, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १ टी स्पून हळद, मीठ चवीने, १ मध्यम आकाराचा कांदा, पाव वाटी चिंचेचा कोळ, १ मोठ्या नारळाचे खोबरे, १ टी स्पून मिरी, ७-८ लाल मिरच्या, १ लहान कांदा, १ टी स्पून तांदळाचे पीठ, ७-८ तीरफळ, १/४ वाटी खोबरेल तेल
कृती : कोलंबी साफ करून धुवून त्याला हळद, मीठ व तिखट लावून बाजूला ठेवा. निम्मे खोबरे वाटून नारळाचे दुध काढून बाजूला ठेवावे. त्यामध्ये तांदळाचे पीठ कालवावे. उरलेल्या खोबऱ्या बरोबर कांदा, मिरी व मिरच्या बारीक वाटून घ्या. कांदा बारीक चिरावा. पातेलीत तेल तापवून त्यात कांदा लालसर परतावा व त्यावर कोलंबी घालावी, चिंचेचा कोळ व कांदा-मिरी-खोबऱ्याचे वाटण घालून तीरफळे ठेचून घालावीत. झाकण ठेवून एक वाफ येवू द्यावी. कोलंबी शिजली की नारळाचे दुध घालून एक उकळी आणावी. व आमटी उतरवावी. नारळाच्या दुधामुळे ती अतिशय चवदार लागते. कैरीच्या दिवसात यात चिंचे आयवजी कैरीच्या फोडी घालाव्यात.
गरम गरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.