फणस : फणस हे एक मोठ्या फळापैकी एक फळ आहे. हे खूप गुणकारी आहे फणसामध्ये बरका व कापा असे दोन प्रकार आहेत.
फणसावर जाड काटे असतात व ह्या काटेरी सालीच्या आत गोड गरे असतात. त्यामध्ये काळ्या किंवा लालसर बिया असतात त्यानां आठळ्या असे म्हणतात. ह्या आठळ्या भाजून खूप छान लागतात किवा त्या आमटीत पण घालतात. हिरव्या फणसाची भाजी बनवतात व ती रुचकर लागते. कोकणामध्ये ही भाजी आवर्जून बनवली जाते.
फणस हा आपल्या शरीराला शक्ती व आरोग्य देणारे जठराग्नीस सतेज बनविणारे व वायुदोष दूर करणारे आहे. कच्चा फणस जुलाबात गुणकारी व बलदायक आहे. तसेच फणसाचे बी हे वीर्यवर्धक असते.
फणसाचे गरे वाळवून दळून मग त्याची पातळ फणसपोळी बनवता येते. फणसाची साली गुरांना खायला देतात त्यामुळे त्या अधिक दुध देतात.
फणसाचे सेवन केल्यावर विड्याचे पान खाऊ नये त्याने पोट फुगते व खूप त्रास होतो. तसेच फणसाचे गरे जास्त प्रमाणात खाऊ नये.