जांभूळ हे एक उत्तम फळ आहे. हे फळ उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरवातीला येते. ग्रीष्मातील अमृत फळ जसे आंबा आहे तसेच जांभूळ हे पावसाळ्यातील अमृत फळ आहे. जांभळा मध्ये दोन प्रकार आहेत. एक राज जांभूळ हे दिसायला सुंदर व गुणांनी श्रेष्ठ असते. दुसरे शुद्र जांभूळ आहे.
जांभळाच्या रसानी सरबत बनवण्यात येते. या सरबताने पोटदुखी व पोटाचे विकार दूर होण्यास मद्त होते. लिव्हरच्या विकारावर जांभूळ हे गुणकारी आहे. हृद्यासाठी जांभूळ हे हितकारक आहे.
जांभळे पाचक व यकृतोत्तेजक असतात. जांभूळ हे अनेक रोगां वर गुणकारी आहे. लिव्हर बिघडल्याने शरीरात रक्तविकार निर्माण होतो. व त्यामुळे अनेकदा पांडुरोग व कावीळ होऊ शकते. ह्या मध्ये लोहाची खूप गरज असते. ते लोह जांभूळ खाल्याने मिळते व रोग बरा होतो.
मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी जांभळाच्या बियाचे चूर्ण हे अमृतसमान आहे. ह्या रुग्णांनी नेहमी जांभळाचे चूर्ण घ्यावे.
लहान जांभळे ही जुलाबात गुणकारी, कफ, पित्त, रक्तदोष तसेच दाह नाशक असतात. तसेच ती श्रम हारक, शीतल पाचक असतात.
बरेच दिवस जांभळे खाल्याने पोटात गेलेला केस अथवा लोखंड बाहेर निघून जाते.
जांभळाच्या सालीच्या काढ्याने गुळण्या केल्याने घशाच्या सुजेमध्ये फायदा होतो.
जांभळे नेहमी जेवल्यानंतर नंतर खावीत, रिकाम्या पोटी कधी खावू नयेत. ती वात दोष निर्माण करणारी आहेत. ज्यांची वात प्रकृती आहे त्यानी कधी जांभळे खाऊ नयेत. ज्याच्या अंगावर सूज आहे, उलट्या होत आहेत, बालंत पणातून उठलेल्या स्त्रियांनी जांभळे खाऊ नयेत. जांभळा वर नेहमी मीठ टाकून खावे.
जांभळामध्ये लोह, फॉस्फरस व चुना विपुल प्रमाणात आहे. असेच फॉलिक असिडही आहे. तसेच जांभळे खाल्याने लघवी शुद्ध होते.
जांभळा पासून आपल्याला रायते, आईसक्रिम, मिल्कशेक, बनवता येते. कारण लहान मुले जांभळे खाण्यासाठी कंटाळा करतात. तर त्यांना जांभळा पासून काही पदार्थ बनवून दिले तर नक्की त्याच्या मुलांना उपयोग होईल.