चॉकलेट म्हटले की लहान मुलांना खूप आवडतात. त्यात खजुराचे चॉकलेट हे आरोग्य दाई पण आहेच. व हे नवीन प्रकारचे चॉकलेट मुलांना नक्की आवडेल. बदाम तर पौस्टिक तर आहेतच.
खजुराचे चॉकलेट
साहित्य :
१५ खजूर
१५ बदाम (थोडे भाजून)
१०० ग्राम चॉकलेट डार्क कंपाउंड
कृती : खजूर धुऊन कोरडा करा. बदाम थोडे गरम करून थंड करा. खरुराच्या बिया काढून त्यामध्ये एक-एक बदाम ठेवा. चॉकलेट कंपाउंड डबल बॉईल सिस्टीमने विरघळून घ्या. थोडे थंड झाल्यावर एक-एक खजूर त्यामध्ये डुबवून बटर पेपरवर ठेवा व नंतर ५ मिनिटे फ्रीज मध्ये ठेवा. घट्ट झाल्यावर सर्व करा. हे चॉकलेट लहान मुलांना खूप आवडतील.