खजुराची कचोरी ही एक साईड डीश म्हणून छान करता येते. मुलांना संध्याकाळी दुधा बरोबर देता येते. व त्याने पोटपण भरते. तसेच त्याच्या तबेतीला पण चांगले आहे. For the English version of the same recipe, see this – Article.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२ कचोऱ्या बनतात
खजुराची कचोरी
साहित्य कचोरि भरण्यासाठी:
२० खजूर
१ टे स्पून खस-खस
६ जरदाळू (बारीक तुकडे करून)
१ टी स्पून वेलचीपूड
१ टे स्पून काजू पावडर
आवरणसाठी :
१ वाटी मैदा
१/२ वाटी गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल (मोहन साठी)
१ टी स्पून तीळ, मीठ
तळण्यासाठी तेल
कृती :-
खजूर धुऊन बिया काढून मिक्सर मधून काढा. जरदाळूचे बारीक तुकडे करा. नंतर खजूर, जरदाळू, खस-खस, वेलचीपूड व काजू पावडर घालून गोळा बनवून घ्या. पोळपाटा वरती लाटून त्रिकोणी तुकडे करा.
मैदा, पीठ, गरम तेल , तीळ, मीठ व थोडे गरम पाणी घेऊन घट्ट पीठ मळून घ्या. त्याचे छोटे-छोटे गोळे करून लाटून त्याला त्रिकोणी आकार द्या. प्रत्येक त्रिकोणा मध्ये खजुराचा त्रिकोण ठेवून तीनही बाजूनी बंद करा.
कढई मध्ये तेल गरम करून कचोरी गुलाबी रंगावरती तळून घ्या.