खजुराचे रोल हे फार चवीस्ट लागतात. खस-खस, सुके खोबरे काजू-बदाम हे सर्व पौस्टिक तर आहेतच. हे रोल लहान मुलांना पण खूप आवडतील. बडीशेपच्या गोळ्या घातल्याने दिसायला पण छान दिसतात. For the English version of the same recipe, see this Article.
खजुराचे रोल
साहित्य :- २०० ग्राम खजूर (धुऊन बिया काढून), १ टे स्पून खस-खस (थोडासा भाजून), २ टे स्पून सुके खोबरे (किसून), १ टे स्पून काजू-बदाम पावडर, १ टी स्पून वेलचीपूड
कृती :- खजूर बिया काढून मिक्सर मधून बारीक करा. नंतर त्यामध्ये थोडी भजलेली खस-खस, भाजलेले सुके खोबरे, काजू-बदाम पावडर, वेलची पावडर, घालून मिक्स करा व गोळा बनवून घ्या. नंतर पोलपाटावर प्लास्टिक पेपर खाजुरचा गोळा ठेऊन परत वरती प्लास्टीक पेपर ठेऊन पातळ लाटून घ्या. नंतर वरचा पेपर काढून १” च्या पट्या कापून घेऊन त्याचे रोल करून घ्या. सगळे रोल करून झाल्यावर खस-खस, सुके खोबरे व बडीशेपच्या गोळ्यांनी सजवून घ्या.