खजुराचे वडी किंवा गोळी ह्या खूप छान लागतात. मुले आवडीने खातात. मुलांच्या टिफीन मध्ये पण देता येतात. त्यामुळे त्याची तबेत पण चांगली राहील.
खजुराचे वडी किंवा गोळी
साहित्य : १ कप खजूर (बीयाकाढून), १ कप दुध, १/४ कप तूप १/२ कप पिठीसाखर, १/४ कप सुक्या खोबऱ्याचा कीस, काजू, वेलचीपूड
कृती: खजुराच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करून एका स्टीलच्या भांडया मध्ये दुध घालून १२ तास तरी भिजत ठेवा. नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या.
एका कढाई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये वाटलेले खजुराचे मिश्रण, खोबऱ्याचा कीस व पिठीसाखर घालून घट्ट होई परंत हलवत राहा.
नंतर त्यामध्ये काजू, वेलची पावडर घालून एकत्र करा. एका स्टीलच्या थाळीला तूप लावून हे मिश्रण थापून घ्या. थंड झाल्यावर वड्या कापा. ह्या वड्या पौस्टिक तर आहेतच व लहान मुलांना खूप आवडतील.