मोगलाई मटण मसाला हा पदार्थ छान खमंग लागतो कारण की ह्यामध्ये मटणचे तुकडे तुपामध्ये तळून घेतले आहते. तसेच सर्व मसाला चांगला परतून घेतला आहे त्यामुळे अगदी चवीस्ट लागतो. मोगलाई पदार्थ बनवताना कच्चा मसाला वापरला आहे त्यामुळे चव पण वेगळी लागते.
English version of the recipe for Mughlai Mutton Masala is given in the article, which can be seen – Here.
साहित्य : ५०० ग्राम मटण, ३ हिरव्या मिरच्या, ३ टे स्पून कोथंबीर, ५ काश्मिरी मिरची, २ तुकडे दालचीनी, १ मसाला वेलदोडा, ३ हिरवे वेलदोडे, १०-१२ लसून पाकळ्या, १ टी स्पून आले (बारीक चिरून), १ टे स्पून धने, १ टे स्पून जिरे, २ मोठे कांदे (बारीक चिरून), ७ मिरे, १/४ टी स्पून हळद, मीठ चवीने, १/२ कप दही, १/४ कप तूप
कृती : मटन धुवून घ्या. कढई मध्ये तूप गरम करून मटनचे तुकडे घालून गुलाबी रंग येई परंत परतून घ्या व नंतर कढई मधून काढून बाजूला ठेवा. कश्मीरी मिरचीचे तुकडे करून थोड्या पाण्यामध्ये १० मिनिट भिजवून ठेवा. दालचिनीचे तुकडे, मसाला वेलदोडा, लसून, आले, धने, जिरे, व निमा कांदा ह्याची बारीक वाटून पेस्ट करा.
कढई मध्ये राहिलेला कांदा घालून थोडा भाजून घ्या. त्यामध्ये वाटलेला मसाला गुलाबी रंगावर भाजून घ्या व दही घालून चांगले परतून घेवून मटणाचे तुकडे घालून २ कप पाणी व मीठ घालून कुकरमध्ये ४-५ शिट्या काढा.
कोथंबीरीने सजवून गरम-गरम पराठा/जीरा राईस बरोबर सर्व्ह करा.