महाराष्ट्रियन पद्द्धीतीने मटन लिव्हर फ्राय ह्या प्रकारे लिव्हर फ्राय केल्याने अगदी खमंग लागते. जसे आपण मटनाला मसाला लावून १-२ तास बाजूला ठेवतो ह्यामध्ये लिव्हर तसे केले तर चवपण छान लागते. ह्यामध्ये पाणी थोडे कमीच वापरायचे ह्याचा मसाला जरा घट्टच असतो. पराठ्या बरोबर किवा तादलाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करा.
English version of the Mutton Liver Fry Recipe can be seen in the article- Here.
साहित्य :
२०० ग्राम मटण लिव्हर
१ १/२” आले (बारीक चिरून)
८ लसून पाकळ्या (बारीक चिरून)
१/२ टी स्पून मिरे पावडर
१ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून जिरे पावडर
२ टी स्पून धने पावडर
१ कप दही
२ मोठे कांदे (चिरून)
१/२ कप कोथंबीर (चिरून)
४ लवंग (पावडर)
२-३ तुकडे दालचीनी (पावडर)
१ मध्यम टोमाटो (चिरून)
मीठ चवीने
३ टे स्पून तेल
कृती : मटण लिव्हर धुवून त्याचे छोटे तुकडे करून घ्या. त्यामध्ये आले, लसून, मिरे पावडर, लाल मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, दही, लवंग, दालचीनी व मीठ घालून चांगले मिक्स करून दोन तास बाजूला ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमाटो, थोडे आले, लसून घालून २-३ मिनिट फ्राय करा. नंतर त्यामध्ये लिव्हरचे भिजवलेले तुकडे घालून कढई वरती झाकण ठेवून व झाकणा वरती पाणी घालून मंद विस्तवावर लिव्हर शिजवून घ्या.