आजकालच्या धकाधकीच्या (धावपळीच्या) जीवनात सुधा तुम्ही तुमच्या पाहुण्याचे आदरातिथ्य कसे करता. कारण आजकाल नवरा व बायको दोघेही कामावर जातात व दोघांना ही सुट्टीचे नियोजन करावे लागते. त्यात मुलांच्या परीक्षा, त्याचे आजारपण वगैरे तसेच आपल्या कामासाठी सुद्धा सुट्ट्या लागतात. म्हणजे सुट्टीचे नियोजन दोघांना आधी पासूनच करावे लागते. त्यात जर कोणी पाहुणे रहायला येणार असतील तर ? व पाहुणेपण खुश झाले पाहिजेत व त्यांना परत यावेसे वाटले पाहिजे. आपण पाहूया की पाहुण्याचे आदरातिथ्या कसे करावे व त्यांना परत यावेसे वाटले पाहिजे.
आजकाल आपल्या जिवलग माणसांचा संपर्कात राहणे कठीण जात आहे. कारण कुटुंब एकदम लहान झाली आहेत. नवरा-बायको कामावर जातात व मुलांना शाळा झालीकी पाळणाघर कुणालाच वेळ नाही. त्यामुळे आज आपल्या अवती भवती आपल्या सोबत आनंदी होणाऱ्या, आपल्या सोबत मनमोकळे पणाने हसणारे, आपल्या सुख-दुखात सहभागी होणारे नातलग मित्र मंडळी ह्यांचा तुटवडा झाला आहे. अशा वेळी आपण व आपली मुले ह्यांना घेवून आपल्या नातेवाईकांना व मित्रांना भेटायला जावे, तसेच आपल्या कडे पण बोलवावे. ते येण्या आगोदर आपण आपले घर, बैठकीची खोली, जेवायची जागा, बाथरूम, बेसिन स्वच्छ करून घ्यावे. चांगली काचेची भांडी काढून नीट टेबलवर मांडावीत, सगळ्यांना आवडेल ते पदार्थ बनवावेत. लहान मुलं येणार असतील तर त्याच्या साठी छोटे छान खेळणे बक्षीस म्हणून आणावे.
पाहुणे आल्यावर टीवी, पुस्तके वाचत बसू नये. त्याच्याशी गप्पागोष्टी कराव्यात हस्त खेळत वेळ मजेत घालवावा. आल्या आल्या त्यांना पाणी, सरबत विचारावे, जेवण व आईस्क्रीम द्यावे. जास्त आग्रह करू नये कारण की ते कृत्रिम वाटते. जाताना मुलांना एखादे गिफ्ट द्यावे. अशानी आपल्या पाहुण्यांना परत यावेसे वाटेल अ आपले सुद्धा सागत आपले पाहुणे त्याच्या घरी चांगल्या प्रकारे करतील.
जर दोघे नवरा बायको यांना सुट्टीचा प्रश्न असेल तर एकाच दिवशी दोघांनी सुट्टी घेवून आपल्या नातेवाईक व मित्रानां एकाच दिवशी बोलवावे. जर नातेवाईक किंवा मित्र सुट्टी रहायला येणार असतील तर आगोदरच ठरवावे की त्यांना कोणकोणती ठिकाणे दाखवायची काय काय नियोजन करायचे ह्याचे वेळापत्रक बनवावे व पाहुणे आलेकी ते वेळापत्रक त्यांच्या सुद्धा सोई नुसार त्यांना सुद्धा दाखवावे. म्हणजे दोघांना सुद्धा बरे वाटेल. त्यामुळे आपले पाहुणे व आपण दोघही सुट्टी आनंदाने घालवू शकतो.
सध्याचा काल खूप वेगवान आहे. प्रतेकाला वेळेचे बंधन आहे. अश्या वेळेस आपण व आपल्या नातेवाईक यांनी समजून घेतले पाहिजे. पूर्वी पाहुणे आले की ८-१० दिवस त्यांचे आदरातिथ्य व्हायचे पण आता ते शक्य नाही. घरातील स्त्री जर कामावर जाणारी असेल तर तिला मग आपल्या घरचे व पाहुण्याचे नास्ता, जेवण बनवून ८.३० ते ९.०० परंत कामावर जावे लागते. अशा वेळेस शक्य असेल तर पाहुण्यांनी सुद्धा थोडी मदत करायला हरकत नाही. पाहुण्याचा आवडता चांगला स्वयंपाक रात्री बनवावा. नाटक, सिनेमा, सहल रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी काढावी. असे केल्याने पाहुणे सुद्धा खुश होतील व आपल्याला सुद्धा त्रास होणार नाही. व एक प्रकारचे आनंद सुद्धा मिळेल की आपण पाहुण्याचा पाहुणचार चांगल्या प्रकारे केला. व पाहुण्यांना सुद्धा वाटेल की आपले आदरातिथ्य छान झाले.
पाहुण्याचे आदरातिथ्य म्हणजे खूप खर्च करून त्यांचे आदरातिथ्य करायचे असे नाही तर उलट आपल्या चांगल्या अनुभवाची देवाण-घेवाण करायची आपले अनुभव सांगायचे पाहुण्यांना जर एकतेच फिरायला जायचे असेल तर त्यांना ठिकाणे नीट समजून द्यावी.
जेव्हा पाहुणे रहायला येणार असतील तर आगोदरच मसाले, दाण्याचा कुट, भाज्या, फळे, लागणारा किराणामाल आगोदरच आणून ठेवावा. मोलकरणीला आगोदरच सगळी कल्पना द्यावी म्हणजे गैरसोय होणार नाही. अशा प्रकारे नियोजन केल्यास पाहुणेपण खुश होतील व त्यांचे आदरातिथ्य पण चांगले होईल.