बदाम : बदाम हे आपल्या अगदी परिचयाचे आहते. व त्याचे किती गुणधर्म आहेत ते आपण पाहूयात.
बदामा मध्ये दोन प्रकार आहेत एक म्हणजे गोड व दुसरा प्रकार कडू आहे. कडू बदाम हे खूप कडू असतात ते औषधामध्ये म्हणजे मलम बनवायला वापरले जातात व हे बदाम विषारी असतात ते खाण्यासाठी वापरू नयेत. गोड हे बदाम खाण्यासाठी वापरले जातात. बदाम हे आकाराने मोठे असलेले वापरावे, मोठे बदाम हे शीतल व खूप पौस्टिक असतात.
बदामामुळे वात, पित्त, व कफ बरा होण्यास मदत होते व मेंदूला व नेत्रांना पुष्टी देतात. मेंदूचा कमजोरपणा घालवण्यासाठी बदामाचा उपयोग होतो. बदामामुळे स्मरण शक्ती वाढते. बदामाचे तेल हे क्षयरोगात फायदेशीर आहे.
डोके दुखी वर बदामाची खीर अतिशय उपयोगी आहे. बदाम कोमट पाण्यात भिजत घालून मग साले काढून टाकावीत व बदाम पाण्यात वाटावेत हा वाटलेला गोळा दुधात कालवून त्याची खीर बनवावी व त्यामध्ये साखर व तूप घालावे. ही खीर खाल्याने शरीरातील शक्ती वाढते, वीर्यवृधी होते. तसेच मेंदू सशक्त बनतो व स्मरणशक्ती वाढते. बदामाचे तेल मस्तकावर लावल्यास डोके शांत होते.