मँगी म्हटले की लहान मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. काही दिवसान पासून मँगी हे प्रकरण खूप गाजत आहे. अगदी लहान मुलांनपासून आजी-आजोबांपरंत सगळे मँगी प्रकरण टिव्ही, पेपर मध्ये बघत आहेत. सगळ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कारण सगळ्यांना मँगीनी सवय लावली होती. फक्त दोन मिनिट पण हे फक्त दोन मिनिट एव्ह्डे घातक असतील असे कोणाला समजले नाही. आता आपल्याला समजले आहे. आपल्या सरकारनी त्याचा छडा सुद्धा लावला आहे व आपले डोळेपण उघडले आहेत.
माझी आई नेहमी म्हणते अग कलीयुग आले आहे. कलीयुगात माणसे माणसाला खाणार बघ. हो ते पण अगदी खरे आहे. आपल्या काही कंपन्या अश्या प्रकारच्या मँगी व अजून काही पदार्थ बनवत आहेत व आपल्या जीवाशी खेळत आहेत.
आपल्याला माहीत आहेच की मँगी मध्ये मोनोसोडीयम ग्लुमेट (एमएसजी) आणि शिसे असे दोन आरोग्याला बाधक पदार्थ त्यात मोठ्या प्रमाणात सापडले . मोनोसोडीयम ग्लुमेट हे एक शरीराला उपयुक्त नसलेले अमिनी अँसिड आहे यामध्ये क्षारा सारखे गुणधर्म असतात व त्यामुळे रक्ताचा घट्ट पणा वाढतो. त्यामुळे त्याचा परिणाम म्हणजे हाता पायावर, शरीरावर सूज येते, हृदयविकार, मुत्र पिंडाचे कार्य मंद होणे, डोके दुखणे, छातीत धडधडणे असे विकार होण्यास सुरवात होते.
मँगीमध्ये शिसेचे प्रमाण जास्त सापडले ते तर शरीराला अत्यंत धोकादायक आहे. ५-६ वर्षा खालील मुलांच्या बुद्धीमते वर त्याचा विपरीत परिणाम होतो व त्याच्या हाडांवर आणि त्याच्या स्नायूवर परिणाम होऊन त्याची वाढ खुंटते. लहान मुलांनच्या वागण्या व बोलण्यावर अनिष्ट परिणाम होतो. असेच मोठ्या माणसांच्या मेंदू, मज्जा संस्था, हाडे मूत्रपिंड ह्यावर परिणाम होतो.
आपल्याकडे लोकप्रिय झालेले चायनीज पदार्थ ह्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात सापडतात. तसेच पँकबंद चिप्स ह्यामध्ये अँक्रीलामाइड नावाचा पदार्थ आहे. त्याने कर्करोगाला निमंत्रण देणे हे होय. चिप्समध्ये क्षार व चरबी युक्त द्रव्याचा प्रमाणा बाहेर वापर केला जातो. ई-६३१ नावाचा डुकराच्या चरबी पासून बनवणारा पदार्थ यात समाविष्ट आहे.
ह्यावरून आता असे दिसते की आता सगळीकडे जंकफूड विरोधात वातावरण निर्माण होत आहे. हे पदार्थ चवीला छान लागतात पण त्याचे दूषपरिणाम पण खूप आहेत.
पूर्वीच्या काळी पण स्त्रिया नूडल्स बनवायच्या पण त्याचे नाव हात शेवयावरून न्युडलस असे झाले. पूर्वीपण शेवयाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे व ते पौस्टिक तर असायचे तसेच चवदार पण असायचे. त्याच हात शेवया वापरून आपण शेव्याचे उपीट, शिरा, खीर व इतर काही पदार्थ बनवू शकतो.
ह्या शेवया घरी बनवलेल्या असतात व पौस्टिक पण आहेत. अनेक स्त्रिया घरी ह्याचा व्यवसाय पण करतात व आपले घर चालवायला मद्द पण करतात. आपण सुद्धा ह्या शेवया वापरून वेगवेगळे पदार्थ बनवून आपले आरोग्य पण चांगले ठेवू या.