लिंबू हे अधिक गुणकारी आहे. त्रिदोष, अग्नी, क्षय, वायुविकार, विष, मलविरोध आणि कॉलरा मध्ये लिंबू उपयुक्त आहे. कृमी व कीड दूर करण्याचा महत्वाचा गुण लिंबा मध्ये आहे, त्यामुळे संसर्गजन्य रोगामध्ये लिंबू अत्यंत हितावह आहे. रक्तदोष व त्वचारोगामध्ये लिंबू गुणकारी असते पण लिंबाचा रस अनोषा पोटी घ्यावा त्याचा जास्त चांगला उपयोग होतो. वर्षाऋतुत बहुतेक वेळा अजीर्ण, उलटी, अरुची, ताप, पातळ शौचास होते तेव्हा लिंबू घेणे हे योग्य होय. मलेरियावर लिंबू रामबाण औषध आहे. इतर तापतही लिंबू अत्यंत फायदेशीर ठरते.
ग्लासभर पाण्यात लिंबू रस व थोडे साखर घालून घेतल्याने पिक्त झाले असेल तर जाते. जर उलटी सारखे होत असेल तर लिंबू कापून त्याच्या फोडीवर साखर घालून त्या चोखल्याने उलटी बंद होते. दोन चमचे लिंबाचा रस व एक चमचा आल्याचा रस घेऊन त्यात थोडी साखर घालून प्याल्याने कोणताही प्रकारची पोटदुखी थांबते.
गरम पाण्यात लिंबाचा रस घालून रात्री झोपताना प्याल्याने सर्दी नाहीशी होते. जर खूप खोकला झाला असेलतर लिंबू रस व मध एकत्र करून घेतल्याने खोकला व दमा बरा होतो. पाण्यात लिंबाचा रस व मिरीची पूड घालून प्याल्याने यकृताचे रोग बरे होतात. लिंबाच्या रसात सौधव घालून बरेच दिवस नियमित पणे प्याल्याने मुतखडा विरघळून जातो.
लिंबू हे आपल्या सौदर्यात पण भर घालते. लिंबू रस व खोबरेल तेल एकत्र करून मालीश केल्याने त्वचेची शुष्कता कमी होते. आंघोळ करताना गरम पाण्यात लिंबू रस घालून आंघोळ केली तर आपली त्वचा मुलायम व चमकदार होते. शरीराला लागणारे व्हीटामीन “सी” भरपूर प्रमाणात असते.