सफरचंद (Apple) आपल्याला माहीत आहे की सफरचंद हे फळांमध्ये एक उत्तम फळ आहे. त्याचे ओषधी गुण पण बरेच आहेत.
इंग्रजी मध्ये म्हण आहे की “ An Apple a day keeps doctor away” तसेच “To eat an Apple before going to bed, will make the doctor beat his breast”
सफरचंदमध्ये अनेक जाती आहेत. त्यामध्ये गोल्डन व डीलीशस ह्या प्रसिद्ध आहेत. सफरचंदा पासून लोणचे, मुरंबा, चटणी व सरबत बनवले जाते. सफरचंदाचा स्वाद आंबट-गोड असा असतो असे सफरचंद उत्तमप्रतीचे समजले जाते. कारण असे सफरचंद पित्तवायूचा प्रकोप शांत करते., तृषा शांत करते. व आतड्यांना मजबूत बनवते. सफरचंदाची साले काढून खाल्याने ते खूप गोड लागते. पण तसे करू नये कारण सालीमध्ये अनेक महत्वाचे क्षार असतात. सफरचंदाचे तुकडे साखरेत घोळून खाल्याने ते फारच गोड लागतात. सकाळी उठल्यावर हे तुकडे अनोश्यापोटी खाल्याने अधिक गुणकारी असतात. रक्तदाब कमी करण्यासाठी ते उत्तम ओषध आहे. शरीरातील विषारी द्रव्ये ते दूर करते. व त्याच्या सेवनाने आपल्या हिरड्या मजबूत होतात. तसेच जठरातील आंबटपणा दूर करण्यासाठी ते ओषध अमृतसमान समजले जाते. झोपतांना सफरचंद खाल्यास मेंदू शांत रहातो व झोप चांगली येते.
तापाबरोबर अंगावर सूज येत असेत , भूक मंद झाली असेल, पातळ जुलाब होत असतील, पोट जड वाटत असेल त्यानी फक्त सफरचंद खावे हे सगळे विकार दूर होतील. त्यानी पचनशक्ती सुधरेल, अशक्तपणा दूर होईल.
चरबी वाढल्यावर जेव्हा थोडेसुद्धा कष्ट सहन होत नाहीत, तहान व भूक लागत नाही, चलताना दम लागतो त्यानी अन्न बंद करून फक्त सफरचंद खावे असे केल्याने खूप फायदा होतो. सफरचंद विस्तवावर भाजून खाल्याने खूप बिघडलेली पचनशक्ती सुधारते. सफरचंद खाल्याने आपले दात पांढरेशुभ्र होतात.
सफरचंदामध्ये ग्लुकोज, लोह, खनिज, क्षार असतात. त्यात जीवनसत्व “बी-१”, आणि “सी” जास्त आहे. असे हे गुणकारी सफरचंद आहे.