आषाढ अधिक मास ह्या वर्षी बुधवार दि. १६ जून २०१५ रोजी चालू होवून १६ जुलै २०१५ रोजी परंत आलेला आहे. आपल्या हिंदू धर्म शात्रामध्ये अधिक मासाचे महत्व मोठे मानले जाते. अधिक मास हा दर बतीस महिने सोळा दिवस व चार घटिका इतक्या कालावधी नंतर येतो.
या अधिक महिन्यात दररोज उपोषण करावे. तसे जमत नसेल तर एक दिवसा आड किंवा हा महिना संपे परंत दररोज फक्त एक वेळ भोजन करावे. तसेच ह्या महिन्यात रोज श्रीविष्णूची पूजा अर्चा करावी श्री विष्णू म्हणजे श्रीकृष्ण व राधा होय. देवापुढे अखंड दिवा लावून रोज देव दर्शन घ्यावे व जपतप करावा तसेच रोज पोथी वाचवी. तीर्थक्षेत्री जावून संगमावर स्नान करावे. जमल्यास गंगा स्नान करावे. ह्या महिन्यात जपाला फार महत्व आहे. जप जर रुद्राक्ष, मोती, पोवळ किंवा स्फटिका च्या माळेने केला तर अधिक उपयोगी होतो. आपले मन प्रसन ठेवावे.
मराठी महिने हे बारा व अधिक मास म्हणजे तेरावा महिना म्हणतात म्हणून ह्या महिन्यात विवाह, मुंज, गृह प्रवेश, धार्मिक संस्कार, देव प्रतिष्ठा करत नाहीत.
आपल्या सृष्टीचा पालन करता श्रीविष्णू आहेत. अधिक मासात व्रते, दाने उपासना केल्यामुळे आपल्याला श्रीविष्णू ची कृपा प्राप्त होते. ह्या महिन्यामध्ये जावयाला (म्हणजे मुलीच्या नवऱ्याला) श्रीविष्णूचे म्हणजेच नारायणाचे रूप मानले जाते. तर मुलीस लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणूनच जावयाला चांदीच्या ताटात ३३ अनारसे ठेवून देण्याची प्रथा आहे व मुलीची ओटी भरावी त्यामुळे आपल्याला स्वर्गलोकाचे पुण्य प्राप्त होते.
आपल्या हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. आपल्या जावयाला पुरणाचे दिंड बनवून खावयास द्यावे म्हणूनच ह्या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात. ब्राम्हणाला तुपाचे दान करावे. सवाष्णीची ओटी भरावी तिला चांदीची जोडवी द्यावी. गरीबाला वस्त्र द्यावे. अधिक महिना हा पवित्र महिना आहे त्यामुळे ह्या महिन्यात चांदीचे दीप दान करावे कारण दीप म्हणजे विष्णूपत्नी लक्ष्मीचे प्रतीक आहे. जर आपल्याला चांदीचे दीप दान करणे जमत नसेल तर दुसऱ्या धातूचा दीवा दान केला तरी चालेल.
अधिक मासाला धार्मिक महत्व खूप आहे व श्रीविष्णूची कृपापण प्राप्त होते.