डाळींब – Pomegranate : डाळिंबाचे काय काय औषधी गुणधर्म आहेत ते आपण बघूया. डाळिंब हे एक सुंदर फळ आहे. ते सोललेकी अगदी मोहक दिसते. त्याचे लाल-लाल पाणीदार दाणे अगदी माणका सारखे दिसतात.
डाळिंबाच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक लाल रंगाचे व दुसरे पांढऱ्या रंगाचे दोन्ही अगदी उत्तम प्रतीचे आहेत. डाळिंब ही गोड व गोड-आंबट अशी असतात.
गोड डाळिंब ही त्रिदोषहारक, तृषा, दाह आणि तापात फायदेशीर असतात तसेच ज्यांना पिक्त्ताचा त्रास होत असेल त्यांना ही अगदी फायदेशीर आहेत. गोड डाळिंब ही बल व बुद्धि वाढवणारी असतात व प्रबळ पितकारक त्रिदोषांना नष्ट करणारी असतात. आंबट-गोड डाळिंब ही वायू प्रकृती असणाऱ्या लोकांना उत्तम आहेत. त्यामुळे वायू व कफ दूर होतो तसेच हृद्य, रुची, उत्पन्न करणारी असतात.
डाळिंबाचा रस पीतशामक असतो व त्याच्या रसाने उलटी होणे बंद होते. जेवणातील अरुची, खोकला, डोळ्यांची जळजळ, बेचैनी वाटणे ह्या तक्रारी दूर होतात. डाळींबाचे सरबत घेतल्याने शरीरातील उष्णता नष्ट होते. गरमीच्या सीझन मध्ये ह्याचे सरबत घेतल्याने डोके दुखत असेल तर थांबते. डाळिंब हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ आहे. तसेच त्याने आपले स्वरयंत्र सुधारते व आपल्या शरीरात एक प्रकारची चेतना येते.
नेहमी ताजे डाळिंब घ्यावे व त्याचा रस काढून त्यामध्ये खडीसाखर घालून प्याल्याने कोणताही प्रकारचा पित्तप्रकोप शांत होतो. डाळिंबाचा रस घेवून त्यामध्ये मीठ व मध घालून घेतल्याने अरुची दूर होते. घसा बसलेला असल्यास डाळिंबाचा रस घेतल्याने तो बरा होतो. डाळिंबाचे साल तोंडात घेवून त्याचा रस चोखल्याने खोकला नाहीसा होतो. डाळिंबाचा रस व साखर सम प्रमाणात घेवून मिक्स करून घेतल्याने छातीत दुखत असेल तर ते थांबते. डाळिंबाच्या रसाने गर्भवती महिलेची उलटी थांबते.
डाळिंब हे श्रेष्ठ फळ आहे हे आपल्याला आता समजले असेलच.