पालक : पालक ह्या पालेभाजी मध्ये जीवनसत्व “ए”, “बी”, “सी”, व “इ” असते. तसेच पालक मध्ये प्रोटीन, सोडियम, क्ल्शीय्म व लोह आहे. पालक हे आपल्या रक्तातील रक्त कणांची वाढ करते. पालक ह्यामध्ये एक विशेष असा गुण आहेकी त्यामुळे बुद्धी वाढण्यास मद्द्त होते.
पालकची नेहमी कोवळी पाने घ्यावी. कारण त्यामध्ये जास्त गुणवत्ता असते. सर्व्ह पालेभाज्यामध्ये पालकची भाजी सर्वात उत्तम आहे. पालकची भाजी ४-५ वेळा चांगली धुवावी. पालकची भाजी शिजवताना पाण्याचा वापर कमी करावा. कारण पालक ह्या भाजी मध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे त्याच्या अंगच्या पाण्यातच भाजी शिजवावी. पालकच्या पानांमध्ये बरेच औषधी गुण आहेत.
पाल्कच्या भाजीच्या सेवनाने मुतखडा विरघळून जातो. आतड्याचे विकार, जुलाब ह्या वर पालक फायदेशीर आहे. लहान मुलांना पालकची भाजी नेहमी द्यावी. त्याने कारण त्यामध्ये रक्त वर्धक गिन आहेत. तसेच रक्त शुद्ध होते. व हाडे मजबूत होतात.
पालक या भाजी पासून बरेच प्रकार बनवता येतात. पालकाचा भात, पालक परोठ, पालक वडी, पालक पुरी, आलू पालक, पालक पनीर. पालक सूप बनवता येते.