भेंडी : भेंडी ही भाजी आपण नेहमी करतो. भेंडी या भाजी मध्ये जीवनसत्व “ए” व “सी” तसेच त्यामध्ये कँल्शीयम, मँग्नेशियम, पोटँशियम, प्रोटीन, लोह, तांबे, असते.
भेंडीच्या भाजी ही पौस्टिक व आरोग्यदायक आहे. मोठ्या भेंडी पेक्षा लहान भेंडी वापरावी. जून झालेली भेंडी निरुपयोगी असते. नेहमी ताजी कोवळी भेंडी वापरावी. भेंडी ही आंबट, वायू, कफकारक व पौस्टिक आहे. भेंडी मुळे जेवणात रुची उत्पन्न होते.
भेंडी च्या भाजी पासून वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, रायते, सूप, रायते बनवता येते.