अंड्याची आमटी ही सर्वाना आवडते. समजा कधी घरात भाजी नसेल तर पटकन करता येते. तसेच घरी कधी अचानक पाहुणे आलेतर लवकर होणारी व चवीला पण छान लागणारी. नारळाच्या दुधामध्ये व ह्या प्रकारचा मसाला वापरून बनवलेली ही आमटी खमंग लागते. नारळ हा आपल्या प्रकृतीला थंड पण असतो.
वेळ बनवण्यासाठी : ३० मिनिट
वाढणी : ४ जणांसाठी
साहित्य :
५ अंडी
१/२ कप नारळाचे घट्ट दुध
१/२ कप नारळाचे पातळ दुध
१ छोटा टोमाटो
१ मध्यम कांदा (चिरून)
मीठ चवीने
१ टे स्पून तूप
मसाला :
२ टी स्पून धने
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून लाल तिखट
४ ओल्या मिरच्या
१/” दालचीनी तुकडा
७-८ मिरे
१०-१२ लसूण पाकळ्या
१/२ कप कोथंबीर
१/२” आले तुकडा हे मसाला सर्व्ह बारीक वाटून घ्या.
कृती : कढई मध्ये तूप गरम करून कांदा व टोमाटो परतून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून तूप सुटे परंत परतून घ्या. मग त्यामध्ये मीठ, नारळाचे पातळ दुध घालून एक उकळी आणावी मग नारळाचे घट्ट दुध घालून उकडलेली अंडी घालावी व एक उकळी आणावी.
जेव्हा आपल्याला जेवायचे असेल तेव्हाच नारळाचे घट्ट दुघ घालून अंडी घालून उकळी आणावी. ही आमटी जेवणाच्या फार अगोदर करून ठेवू नये.
Looks yummy!! Could you translate this lovely recipe to English please