भेंडीची चिंच गुळाची भाजी (Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji ) : चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला छान लागते. चिंच गुळ घातल्याने आंबट गोड अशी चव लागते व गोडा मसाला घातल्याने खमंग लागते. ही महाराष्ट्रीयन पध्दतिची चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला अप्रतीम लागते. महाराष्ट्रात ह्या प्रकारची भाजी खूप प्रसिद्ध आहे.
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम भेंडी ( छोटी कोवळी)
१ टे स्पून चिंचेचा कोळ
१ टे स्पून गुळ (चिरून)
मसाला भरण्यासाठी :
१ मध्यम आकाराचा कांदा
१/४ कप नारळ (खोवून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गोडा मसाला
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
७-८ मेथी दाणे
७-८ धने दाणे
मीठ (थोडेच कारण मसाल्या मध्ये पण मीठ आहे)
कृती : भेंडी धुवून कोरडी करून घ्या. मग त्याचे दोन तुकडे करून भेंडीला उभा (X अशा प्रकारचा) चीर द्या. मसाला सर्व मिक्स करून घ्या. प्रत्येक भेंडीमध्ये भरून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून फोडणी तयार करा. फोडणी झाल्यावर भरलेली भेंडी घालून मिक्स करा. दोन मिनिट झाकण ठेवा. झाकण काढून मंद विस्तवावर शिजू द्या. शिजल्यावर त्यामध्ये चिंच गुळ घालून एक सारखी हलवून परतून घ्या.