भेंडीच्या चकत्याची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी आहे. ह्या प्रकारची भेंडीची भाजी लहान मुलांना खूप आवडते. ही बनवायला सोपी व पटकन होते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. व आवडीची भाजी डब्यात असल्या बरोबर डबापण सगळा संपतो. ही भाजी चपाती बरोबर चांगली लागते.
साहित्य : २५० ग्राम कवळी भेंडी, मीठ चवीने, १ टे स्पून कोथंबीर (चिरून)
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद, २ हिरव्या मिरच्या (मोठे तुकडे करून), ७-८ कडीपत्ता पाने
कृती : भेंडी स्वच्छ धुवून कोरडी करून घ्या मग तिच्या पातळ चकत्या कापा. हिरव्या मिरच्याचे मोठे तुकडे करा म्हणजे डब्यात भरतांना मिरच्या काढून टाकता येतील.
कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, हळद, मिरच्या, कडीपत्ता पाने घालून मग मीठ चवीने घाला एकसारखे मिक्स करून भेंडीच्या चकत्या घालुन मिक्स करा व मंद विस्तवावर भाजी खमंग परतून घ्या.
कोथंबीर घालून मग चपाती बरोबर सर्व्ह करा.