छोट्या कोलंबीचे लोणचे (ओली काड, छोटे झिंगे किंवी सुंगट) : कोलंबीचे लोणचे हे महाराष्ट्रीयन पद्द्धीतीने बनवले आहे हे लोणचे चवीला फार चांगले लागते. व ते ४-५ दिवस छान टिकते. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात अशा प्रकारचे लोणचे बनवले जाते.
साहित्य : ३ मोठे आकाराचे टोमाटो, १ कप कोलंबीचे (साफ करून), १/२” आले तुकडा, १०-१२ लसून पाकळ्या, १ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर, १/४ टीस्पून हळद, १ टीस्पून चिंचेचा कोळ, मीठ व साखर चवीला
मसाला गोळी : १/२” आले, १०-१२ लसून पाकळ्या, १ १/२ टी स्पून लाल मिरची पावडर, १/४ टी स्पून हळद, चिंचेचा कोळ घालून मासला गोळी वाटून घ्यावी.
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १/४ टी स्पून हिंग, ७-८ कडीपत्ता पाने
कृती : टोमाटो धुवून चांगले शिजवून घेवून त्याची साले काढावीत व त्याची पेस्ट करून घ्यावी. एका कढईत तेल गरम करून फोडणी करून घेवून त्यामध्ये साफ केलेला कोलंबीचे घालून परतून घ्यावी मग त्यामध्ये मसाला गोळी घालून चांगली परतून घ्यावी. टोमाटो पेस्ट, मीठ, साखर, घालून मिक्स करून एक उकळी आणावी.
हे लोणचे चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावे.