काश्मिरी पुलाव : काश्मिरी म्हटले की आपल्या डोळ्यासमोर रंगी-बेरंगी खूप प्रकारची फुले येतात. तसेच हा काश्मिरी पुलाव आहे हा पौस्टिक पण आहे. त्यामध्ये भाज्या व फळे आहेत त्यामुळे खूपच छान लागतो. गाजर, मटर, फरसबी, व अननस आहे त्यामुळे रंगीत दिसतो. अननस वापरला आहे त्यामुळे चविस्ट लागतो.
साहित्य : २५० ग्राम बासमती तांदूळ, १/४ कप मटार, १/४ कप गाजर, १/४ कप फरसबी, २ अननसाच्या स्लाईस, ३-४ चेरी, १ लहान सफरचंद, १ लहान संत्रे, ३ लवंग, ३ मिरी, ३ वेलची, २ दालचीनी, लेमन यलो कलर, २ टेस्पून तेल, मीठ चवीने
कृती : फरसबी व गाजर चिरून घ्याव्यात व उकडून घ्या. फळांचे तुकडे करून घ्यावे. तांदूळ धुवून निथळत ठेवावे. एका पसरत पातेल्यात १ टेस्पून तेल गरम करून त्यामध्ये लवंग, मिरी, वेलची, दालचीनी घालून थोडे परतून घ्यावे. तांदळाच्या पावणे दोन पट पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व ४-५ थेंब यलो कलर घालून तांदूळ घाला व भात शिजवून घ्या. व थंड करायला ठेवा. दुसऱ्या एका पसरट भांड्यात एक टे स्पून तेल गरम करून शिजलेल्या भाज्या व चिरलेली फळे घालून परतून घ्या. मग भात घालून परत थोडा परतून घ्या.
सर्व्ह करतांना वरतून चेरीचे तुकडे घालून सजवा व कोशंबीरी बरोबर हा पुलाव द्या.