फिरनी हा एक स्वादीस्ट पदार्थ आहे. खर म्हणजे कश्मीर मधील एक लोकप्रिय डिश आहे. पण आता ही डिश सगळ्या प्रांतात बनवली जाते. ह्या मध्ये मी जरा केवडा इसेन्स वापरले आहे त्यामुळे जरा वेगळी चव लागते. फिरनी आपण पार्टी साठी डेझर्ट म्हणून बनवू शकतो. तसेच आपल्या सणासाठी सुध्दा बनवू शकतो.
English version Phirni recipes can be seen in the articles- Here and Here
साहित्य
१ लिटर दुध (म्हशीचे), १/२ कप तांदूळ (आंबेमोहर), १ ३/४ कप साखर, १ टी स्पून वेलची पावडर, १० बदाम (किसून), १५ पिस्ता (किसून), २-३ थेंब केवडा इसेन्स
कृती
प्रथम २ तास तांदूळ भिजत ठेवा. नंतर पाणी काढून थोडावेळ निथळत ठेवुन मिक्सर मध्ये बारीक पावडर करा. दुध तापवून घ्या व त्यामध्ये तांदुळाची पावडर टाकून १० मिनिट सारखे ढवळत रहा मग त्यामध्ये साखर टाकून १० मिनिट ढवळत मंद विस्तवावर ठेवा. थंड झाल्यावर वेलची पावडर, बदाम, पिस्ता व केवडा इसेन्स टाकून थंड करायला ठेवा.
टीप : फिरनी बनवण्यासाठी आंबेमोहर तांदूळ वापरा त्याने छान होते. तसेच ती थंड करून मगच सर्व्ह करा. वेगळी चव पाहिजे असेल तर आपण त्यामध्ये आंब्याचा रस सुद्धा मिक्स करू शकतो. मी तसे करून बघितले आहे छान लागते.