कारल्याचे लोणचे : आपण नेहमी लिंबाचे, कैरीचे, मिरचीचे वगैरे लोणची बनवतो. कारल्याचे लोणचे हे चवीला खूप छान लागते. व तोंडाला चव पण येते. हे लोणचे गरम गरम भाकरी व चपाती बरोबर चांगले लागते.
कारल्याचे लोणचे बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
३ लहान आकाराची कारली
२ टे स्पून मोहरीची डाळ
१ टे स्पून लिंबू
मीठ चवीने
फोडणी साठी :
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
६-७ मेथी दाणे.
कृती : कारली धुवून खरवडून घ्यावी व त्याच्या गोल चकत्या कराव्यात. कढई मध्ये तेल गरम करून फोडणी करावी व त्यामध्ये कारल्याच्या चकत्या घालून मीठ घालून हलवून, मंद विस्तवावर झाकण ठेवून शिजू द्यावे. मधून मधून झाकण काढून कारली हलवावीत. नंतर त्यामध्ये मोहरीची डाळ, लिंबू रस घालून थोडी परतून घ्यावीत. खूप जास्त परतू नये नाहीतर करपत लागतील. हे कारल्याचे लोणचे तातपुरते आहे.
The text of this recipe in English Language can be Seen here: Quick Instant Bitter Gourd Karela Lonche
The Video of this recipe can be seen here: Maharashtrian Style Tasty Spicy Bitter Gourd Karlyache Lonche