कारल्याची भाजी : कारली म्हंटले की लोकांना कडू कारले डोळ्या समोर येते. पण ते किती पौस्टिकव औषधी आहे ते आपल्याला माहीत आहेच. कारल्याची भाजी किती सुंदर लागते. कारल्याच्या भाजी समोर बाकी भाजांची चव अगदी फिक्या लागतात. असे आहे हे कडू कारले.
बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
३ मध्यम आकाराची कारली
१ टे स्पून चिंच कोळ
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ १/४ टी स्पून गरम मसाला
३ टे स्पून गुळ
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
कृती :
कारली धुवून वरतून खरवडून घ्यावी. त्याला मीठ चोळून उकडून घ्यावी. उकडल्यावर त्यातील पाणी दाबून काढावे.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग घालून कारली, चिंच, मीठ, लाल मिरची पावडर, हळद व गरम मसाला, घालून परतून घ्यावी. जेव्हा भाजीतले पाणी थोडे आटेल तेव्हा गुळ घालून भाजी थोडी शिजू द्यावी.
कारल्याची ही भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी. छान लागते. गरम मसाला नसेल तर सांबर मसाला पण छान लागतो.