खिमा पोहे : आपण नेहमीच कांदा पोहे, बटाटा पोहे, मटर पोहे बनवतो. खिमा पोहे हे अगदी उत्कृष्ट लागतात. ही जरा वेगळीच पद्धत आहे. मटन खिमा च्या आयवजी आपण चिकन खिमा वापरून सुद्धा आपण हे पोहे बनवू शकतो.
खिमा पोहे बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२५० ग्राम मटण खिमा (शिजवून)
२५० ग्राम पोहे (जाडे)
२ कांदे (चिरून)
४-५ हिरव्या मिरच्या
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१ टे स्पून लिंबू रस
मीठ चवीने
२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
कोथंबीर व खोवलेला नारळ सजवण्यासाठी
कृती :
१ टे स्पून तेल कढईमध्ये गरम करून त्यामध्ये आले-लसून पेस्ट व खिमा फ्राय करून घ्या व त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, लिंबू रस, मीठ व थोडे पाणी घालून १५ मिनिट शिजवून घ्या.
चाळणीमध्ये पोहे भिजवून घ्या. व त्याला लिंबू रस व मीठ लावा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कांदा, हिरवी मिरची घालून ३-४ मिनिट मंद विस्तवावर फ्राय करून घ्या.मग त्यामध्ये हळद व शिजलेला मटण खिमा घालून २-३ मिनिट फ्राय करून त्यामध्ये भिजवलेले पोहे, कोथंबीर व खोवलेला नारळ घालून मिक्स करा.
कोथंबीर व नारळाने सजवून गरम-गरम सर्व करा.
Note- English version of the same recipe, using Chicken Keema can be seen in the article – Here.