केसर पनीर ग्रेव्ही : पनीर म्हंटले की आपल्याला पनीर च्या बरेच पदार्थ करता येतात तसेच नाना प्रकारच्या पनीर ग्रेव्ही बनवता येतात. केसर पनीर ग्रेव्ही फार छान लागते. ह्या मध्ये केसर, काजू घातले आहेत तसेच फ्रेश क्रीमने चांगली चव लागते. ही ग्रेव्ही चपाती, परोठा किंवा जीरा राईस बरोबर सर्व्ह करता येईल. केसर व काजू मुळे हिला शाही ग्रेव्ही म्हणता येईल. केसर पनीर ग्रेव्ही पार्टी साठी करायला चांगली आहे.
The English language version of the same recipe is published – Here
साहित्य : २०० ग्राम पनीर (तुकडे करून)
मसाला (वाटून) : कांदा (थोडा उकडून कापून), २ मध्यम टोमाटो (उकडून प्युरी) १/२” आले, २ टे स्पून नारळ (खोवून), ५-६ काजू, १/२ टे स्पून जिरे, २ हिरवे वेलदोडे (सोलून), मीठ व साखर चवीने, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १ टी स्पून धने पावडर, १/२ कप कोथंबीर, १/३ टी स्पून केसर (कोमट दुधात भिजवून), १/४ कप फ्रेश क्रीम
कृती : प्रथम कांदा, आले, नारळ, काजू, जिरे, हिरवे वेलदोडे, घालून मसाला वाटून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून वाटलेला मसाला २-३ मिनिट परतून घ्या. मग लाल मिरची पावडर, धने पावडर, मीठ, साखर, घालून दोन मिनिट परतून घ्या.
मग त्यामध्ये टोमाटो प्युरी, १/२ कप पाणी, फ्रेश क्रीम, केसर, पनीर घालून मिक्स करा व दोन-तीन मिनिट शिजू द्या.
कोथंबीरीने सजवा व सर्व्ह करा.