खमंग भरलेला भेंडी (Khamang Bharli Bhendi) : खमंग भरलेला भेंडी ही मराठी पद्धतीने बनवलेली आहे. ह्यामध्ये ओल्या नारळ व कोथंबीर वापरून हिरवा मसाला बनवला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी अगदी खमंग लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर छान लागते.
The English language version of this stuffed lady fingers recipe and preparation method can be seen here – Bharli Biindi
बनवण्या साठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जण
साहित्य : २५० ग्राम भेंडी (कोवळी), मीठ चवीने
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद, मीठ (थोडेसे कारण मसाल्यामध्ये थोडे मीठ आहे) ७-८ कडी पत्ता
मसाला भरण्यासाठी : १/२ कप नारळ (खोवून), १/४ कप कोथंबीर, २ हिरव्या मिरच्या, ७-८ लसूण पाकळ्या, १/२” आले (चिरून), मीठ थोडेसे
कृती : भेंडी धुवून कोरडी करावी व त्याचे दोन तुकडे करून त्याला मध्ये (X असा) चीर द्यावा. हिरवा मसाला मिक्सरमध्ये वाटून घ्यावा. व चिरलेल्या भेंडी मध्ये भरावा.
कढई मध्ये तेल गरम करून फोडणी करावी व त्यामध्ये मसाला भरलेली भेंडी घालून चांगली परतून घ्यावी.
ही भेंडी छान खमंग लागते चपाती बरोबर सर्व्ह करावी.
टीप : भेंडी धुतल्यावर नेहमी पुसून कोरडी करावी म्हणजे भाजी बुळबुळीत होत नाही.
The Marathi language video of this Bharli Bhendi recipe can be seen on our YouTube Channel- https://www.youtube.com/watch?v=WnrbMP0Cmjk