खमंग भरलेल्या कारल्याची भाजी : कारल्याच्या वेगवेगळ्याप्रकारे भाज्या करता येतात. कोणत्याही प्रकारे कारल्याची भाजी बनवली तरी छान लागते. लहान मुले कारल्याची भाजी आवडीने खात नाहीत पण चिच-गुळ घालून भाजी खूप छान लागते. मुलांना आवर्जून खायला द्या. व ती किती पौस्टिक आहे ते पण पटवून सांगा. कारल्याची ही भाजी थोडी रश्याची आहे त्यामुळे ती चपाती बरोबर चांगली लागते.
साहित्य : २५० ग्राम कारली (पांढरी), मीठ चवीने
सारणा साठी : ४ टे स्पून शेंगदाणे कुट, १ टी स्पून लाल मिरची पावडर, १/२ टी स्पून गरम मसाला, मीठ व गुळ चवीने, ५ लसून पाकळ्या (ठेचून), १ टे स्पून तेल
कृती : सारण : शेंगदाणे कुट, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ गुळ, लसूण घालून सारण तयार करावे.
कारली धुवून ती खरवडून घ्यावीत व आतील बिया काढून पोकळ करावीत. पोकळ केल्यावर त्यामध्ये बनवलेले सारण भरावे.
कढई मध्ये तेल गरम करून कारली घालून परतून घ्यावीत व मंद विस्तवावर झाकण ठेवून शिजवून घ्या. मधून मधून झाकण काढून परतून घ्या. झाकणाचे पाणी कारल्यावर पडू देवू नका म्हणजे कारली छान खमंग होतात.
गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करा.