वांग्याचे भरीत : वांग्याचे भरीत हे खानदेशात फार लोकप्रिय आहे. हे भरीत गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करतात. भाकरीवर लोण्याचा गोळा घेवून द्यावे. पुर्वीच्या काळी स्त्रिया चुली वर वांगे भाजून घेवून भरीत करायच्या त्याची चव अगदी अप्रतीम लागायची. पण कालांतराने चुली बंद होऊन त्याची जागा घेतली गँसने घेतली. हे भाजलेले भरीत छान लागते. तसेच हे बनवायला अगदी सोपे आहे.
साहित्य : १ भरताचे मोठे वांगे, २ छोटे कांदे (बारीक चिरून), १/२ कप दही, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), मीठ चवीने
कृती : भरताच्या वांग्याला तेल लावून मग मंद विस्तवावर भाजून घेवून त्याची साले काढून कुस्करून घ्या. मग त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, दही, हिरव्या मिरच्याचे तुकडे, चवीनुसार मीठ, कोथंबीर, मिक्स करून घ्या.
गरम गरम भाकरी बरोबर सर्व्ह करा.