कुरकुरीत कांदा भजी ही भजी छान कुरकुरीत व अतिशय चवीस्ट लागतात. ही भजी चहा बरोबर किंवा जेवणामध्ये पण करता येतात. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर कांदा भजी व त्या बरोबर गोड शिरा हा मेनू छान जमेल. आता पावसाला पण चालू झाला आहे. पाउस असताना मस्त गरम-गरम चहा-कॉफी व कांदा भजी एकदम मस्त.
The English version recipe for the same preparation of Maharashtrian Style Onion Pakoras, can be seen in the article – Here.
साहित्य : ४-५ मोठे कांदे, ४-५ हिरव्या मिरच्या, ८-१० लसूण पाकळ्या, १” आले तुकडा, ८-१० कडीपत्ता पाने १ टे स्पून तेल (गरम), १ टी स्पून लाल मिरची पावडर, १/२ टी स्पून हळद, १ १/२ कप बेसन, १ १/२ कप कोथंबीर, तळण्यासाठी तेल.
कृती : कांदे उभे पातळ चिरून घ्या. हिरव्या मिरच्या, लसूण, आले, कोथंबीर व कडीपत्ता बारीक चिरून घ्या. मग कांदा, हिरव्या मिरच्या, आले, लसूण, कोथंबीर, बेसन, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, कडीपत्ता, गरम तेल मिक्स करून घ्या व नंतर त्यामध्ये दोन ते तीन टे स्पून पाणी घालून चांगले मिक्स करा मिश्रण जास्त पातळ नसावे थोडे घट्टच असावे.
कढई मध्ये तेल गरम करून हातानी बेसनचे मिश्रण थोडे थोडे सोडावे व विस्तव मंद ठेवून भजी कुरकुरीत तळून घ्यावीत. भजी जास्त काळपट होता कामा नये नाहीतर ती करपट लागतील.
गरम गरम सॉस किंवा चिंचेची चटणी बरोबर सर्व्ह करावे.