पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते.
The English language version of this vegetable dish can be seen here – Tasty Palak Paneer
पालक पनीर बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप पालक प्युरी
१ मोठा कांदा (चिरून)
१०-१२ लसून पाकळ्या
१/२” आले तुकडा (चिरून)
२-३ हिरव्या मिरच्या
१/४ टी स्पून दालचीनी पावडर
१ टे स्पून फ्रेश क्रीम
१ छोटा टोमाटो प्युरी (उकडून प्युरी करणे आवडत असल्यास घाला)
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
१०० ग्राम पनीर
कृती
पालक मध्यम जुडी निवडून, धुवून उकडून घ्या. थंड झाल्यावर मिक्सर मधून काढा.
कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची मिक्सर मधून बारीक करून घ्या. कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांद्याची पेस्ट ५-७ मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये पालकची पेस्ट, मीठ, दालचीनी पावडर, फ्रेश क्रीम घालून मिक्स करून चांगली उकळी आणा. नंतर त्यामध्ये पनीरचे तुकडे घालून परत दोन मिनिट गरम करून घ्या.
पालक पनीर गरम गरम पराठ्या बरोबर सर्व्ह करा.
टीप: पालकची कोवळी व ताजी पाने वापरावीत त्याने भाजी चांगली होते.
ह्या भाजी मध्ये टोमाटो आवडत असत्यास घाला पण टोमाटोनी चव चांगली येते. हळद वापरू नये त्याने रंग बदलतो.
भाजी शिजवताना खूप पाणी घालू नये. पनीर ताजे वापरावे. पनीर नसेल तर बटाटे उकडून थोडे फ्राय करून घालावे छान लागतात.