पंजाबी पालक बटाटा भाजी : पंजाबी पालक ही पालक ची भाजी चविस्ट लागते. ह्यामध्ये बटाट्याचे उभे तुकडे तळून घातल्याने भाजीची चव छान लागते. पंजाबी पालक ही भाजी महाराष्ट्रात सुद्धा प्रसिद्ध आहे. मुलांना ही भाजी शाळेत जातांना डब्यात चपाती बरोबर देता येईल व ही खमंग भाजी त्यांना आवडेल. पालक हा मुलांसाठी पौस्टिक पण आहे.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
एक पालकची लहान जुडी
१ मोठा बटाटा (सोलून उभे तुकडे करून)
१ मोठा कांदा (उभा पातळ चिरून)
७-८ लसून पाकळ्या (चिरून)
१/२” आले (चिरून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
कृती :
पालक निवडून चांगला ४-५ वेळा धुवून घ्या. मग चिरून घ्या. कांदा उभा पातळ चिरा, बटाटा सोलून त्याचे उभे तुकडे करा व तेलाल थोडे परतून घ्या. लसूण, आले, हिरवी मिरची बारीक तुकडे करा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, आले, लसून, हिरवी मिरची गुलाबी रंगावर परतून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला पालक घालून दोन टे स्पून पाणी घाला.