पुरणाचे धोंडे /दिंड – Purnache Dind [Dhonde] : आता सध्या आषाढ-अधिक महिना चालू आहे. ह्या महिन्यात पुरणाची धोंडे/दिंड ह्या पदार्थाला खूप महत्व आहे. हा महिना महाराष्ट्रात जास्त मानला जातो. आपल्या जावयाला व मुलीला ह्या महिन्यात घरी बोलवून जावयाला श्री विष्णू चे रूप मानले जाते व मुलीला लक्ष्मी चे रूप मानले जाते. जावयाला घरी बोलवून जेवणासाठी धोंडे/ दिंड बनवतात. व चांदीच्या किंवा इतर धातूच्या ताटात अनारसे देतात. मुलीची ओटी भरून तिला चांदीची जोडवी दिली जातात. दान धर्म केले जाते. हे धोंडे कसे बनवायचे ते बघूया.
The Marathi language video of this Purnache Dind [Dhonde] can be seen on our YouTube Channel: Nag Panchami Special Purnache Dind
साहित्य : आवरणासाठी : २ वाट्या गव्हाचे पीठ, २ टे स्पून मैदा, २ टे स्पून तेल मीठ चवीने
पुरणाचे सारण : २ कप हरभरा डाळ, २ कप साखर, १/२ कप साखर, १ टी स्पून वेलचीपूड, १/४ टी स्पून जायफळ पूड, मीठ चवीने
कृती : हरभरा डाळ धुवून त्यात ४ कप पाणी घालून कुकरमध्ये डाळीला ४-५ शिट्या द्या मग पाच मिनिट मंद विस्तवावर डाळ शिजू द्या. (डाळ अगदी मऊ शिजली पाहिजे) कुकर थंड झाल्यावर डाळ चाळणी मध्ये काढावी म्हणजे जास्तीचे पाणी काढता येईल व त्या पाण्याची कटाची आमटी बनवता येईल. शिजलेला डाळ परत कुकरमध्ये घालून गुळ व साखर घालून मिक करा व मंद विस्तवावर डाळ घोटत रहा. पुरण इतके घट्ट झाले पाहिजे की पूरणामध्ये झारा उभा राहिला पाहिजे. मग त्यामध्ये वेलचीपूड, जायफळ पूड, मीठ घालून मिक्स करून पुरण यंत्रातून वाटून घ्यावे.
डाळ शिजत ठेवल्यावर परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ घालून चाळून घ्यावे. मग त्यामध्ये गरम तेल व पाणी घालून कणीक सैलसर मळून १ ते १.३० तास बाजूल ठेवावी. मग त्याचे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे करून पुरीच्या आकाराचे लाटून घ्या. व त्यामध्ये १ टे स्पून वाटलेले पुरण पुरीवर पसरवून पुरीची वळकटी करा व त्याची गोल आकार द्या. असे सर्व बनवून घ्या.
एका जाड बुडाच्या पातेलयात अर्धे पातेले पाणी घेवून पातेले विस्तवावर ठेवा व त्यावर चाळणी ठेवून चाळणीवर केळ्याचे पान ठेवा मग पानावर जेव्हडे पुरणाचे धोंडे बसतील तेव्हडे ठेवा. चाळणीवर घट्ट झाकण ठेवून १२-१५ मिनिटे धोंडे उकडून घ्यावेत.
गरम गरम सर्व्ह करावीत सर्व्ह करतांना साजूक तूप घालावे.
टीप : कणिक मध्ये गरम मोहन नक्की घालावे म्हणजे धोंडे उकडल्यावर चिवट होणार नाहीत.
पुरणामध्ये पुरण शिजत असतांना १/२ कप ओला खोवलेला नारळ घातला तर पुरण अजून छान लागते.
कणकेच्या एवजी आपण तांदळाच्या पिठीचे उकडलेले जसे मोदक बनवतो तसे धोंडे बनवले तरी छान लागतात.