रव्याचे उपीट Shahi Upit – Upma : रव्याच्या उपीटाला सांजा सुद्धा म्हणतात. रवा हा आपल्या आरोग्याला पण हित कारक आहे. आपल्या कडे अचानक पाहुणे आले तर झटपट तिखट उपीट बनवता येते. तसेच मुलांना डब्यात देता येतो. सकाळी नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा करता येतो. रवा तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे खमंग लागतो. जेव्हा आपल्याला ताप असेल किंवा तब्येत बरी नसेल तेव्हा गरम गरम उपीट बनवून द्या छान तरतरी वाटेल.
रव्याचे उपीट बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
English version recipe of the Shahi Upma recipe can be seen – Here
साहित्य : २ कप रवा, १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून), १ टे स्पून तूप, २-३ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), १ टे स्पून लिंबू रस, २ टे स्पून नारळ (खोवून), कोथंबीर, मीठ चवीने
फोडणी साठी : १ टे स्पून तेल , १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १ टी स्पून उडीद डाळ, ७-८ कडीपत्ता पाने
कृती : प्रथम कढई मध्ये तूप गरम करून रवा मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घेवून एका प्लेटमध्ये काढून ठेवा.
कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, उडीद डाळ, हिरवी मिरची, कांदा घालून मग गुलाबी रंगावर पारून घ्या. मग त्यामध्ये मीठ, व भाजलेला रवा मिक्स करून लिंबू रस, कोथंबीर, खोवलेला नारळ घालून मिक्स करून ४ वाट्या गरम पाणी घालून परत मिक्स करून झाकण ठेवा. मंद विस्तवावर ४-५ मिनिट वाफ येऊ दे मग विस्तव बंद करा.
गरम गरम सर्व्ह करा. वरतून बारीक शेव, कोथबीर व नारळ घाला.
टीप : तुपा मध्ये रवा चांगला भाजला पाहिजे पण रवा काळपट रंगावर नको. रवा चांगला भजल्यामुळे उप्पीट छान मोकळे होईल चिकट होणार नाही.
उडीद डाळ आयवजी मटार, गाजर, शेंगदाणे सुद्ध वापरू शकता त्याने पण चव चांगली येते.
कांदा जर आपल्याला हवा असेल तर घाला नाहीतर त्या आयवजी काजू घाला त्यामुळे आपले शाही उपीट बनेल.