झटपट सँलेड हे सँलेड अगदी पौस्टिक आहे. तसेच ते चवीला पण चांगले लागते. नेहमीच्या सँलेडपेक्षा वेगळे लागते.
साहित्य : २०० ग्राम फ्लॉवर (बारीक तुकडे करून), १ मोठे लाल गाजर (बारीक तुकडे करून), १०० ग्राम श्रावणघेवडा (बारीक चिरून), १ कप मटार (उकडून), १ मोठा बटाटा, १ १/२ कप दही, २-३ हिरव्या मिरच्या (तुकडे करून), मीठ चवीने.
कृती : उकडलेला मटार, हिरव्या मिरचीचे तुकडे व दही हे सर्व मिक्सर मधून काढावे. पाणी गरम करून त्यामध्ये एक चिमुट सोडा घालून, फ्लॉवर, गाजर, श्रावणघेवडा, व बटाटा अर्धवट उकडून घ्या. बटाट्याच्या लहान फोडी करून घ्या. थंड झाल्यावर त्यामध्ये मिक्सर मधून काढलेले दही घालून मिक्स करून घ्या.