आषाढ हा मराठी महिना आहे. ह्या महिन्यातील आपला मराठी लोकांचा आवडता दिवस तसेच महत्वपूर्ण दिवस म्हणजे आषाढी एकादशी आहे.
आषाढ महिन्यात ज्ञानेश्वर-माऊली-तुकाराम ह्याचे लाखो भाविक एकत्र जमुतात. ज्ञानेश्वर-माऊली-तुकाराम ह्याच्या पादुका घेवून ते हरिनामाचा गजर करत, चालत, वाजत गाजत श्री क्षेत्र देहू व आळंदी येथून प्रस्थान करून ते श्री क्षेत्र पंढपूर येथे पांडुरंगाच्या भेटीला जातात. ही वारी अत्यंत आनंद देणारी व आपले मन भरून आणणारी आहे. किती उन असो, पाऊस असो हे भाविक खूप श्रद्धेने चालत जातात. ह्या वारी मध्ये गरीब-श्रीमंत असे लाखो भाविक असतात. ही महाराष्ट्रातील लोकांची खूप श्रद्धेची वारी आहे. ही भाविकांची वारी आषाढी एकाद्शीला श्री ज्ञानेश्वर-माऊली-तुकाराम ह्याच्या पादुका घेवून श्री विठ्लाच्या भेटीला पंढरपुरला पोचतात. हा भेटीचा सोहळा खूप आनंददाई आहे.
आषाढी एकादशी हा दिवस महाराष्ट्रात सर्वत्र साजरा करतात त्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात तेव्हा फक्त उपवासाचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात व श्री विठ्लाचे नामस्मरण करून भजन-कीर्तन केले जाते. व पांडुरंगाची, ज्ञानदेवाची, संत तुकाराम यांची आरती म्हटली जाते.
आरती पांडुरंगाची
युगें अठ्ठाविस विटेवरी उभा | वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा |
पुंडलिका भेटीं परब्रह्म आले गा | चरणीं वाहे भीमा उध्दरी जगा ||१||
जयदेव जयदेव जय पांडुरंगा | रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावें जीवलगा ||धृ||
तुळसी माळा गळां कर ठेवून कटीं | कासे पितांबर कस्तुरी लल्लाटीं |
देव सुरवर नित्य येती भेटी | गरुड हनुमंत पुढे उभे राहती ||२||
आषाढी कार्तिकी भक्त जन येती | चंद्रभागेमाजी स्नाने जें करिती |
दर्शन हेळामात्रें तयां होय मुक्ती | केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ||३||
आरती ज्ञानदेवाची
आरती ज्ञानराजा | महाकैवल्या तेजा | सेविती साधू संत | मनु वेधला माझा ||१||
आरती ज्ञानराजा ||धृ||
लोपलें ज्ञान जगीं | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नांव ठेविलें ज्ञानी ||२||
प्रगट गुह्य बोले | विश्व ब्रह्मचि केले | रामा जनार्दनी | पायीं टकचि ठेलें ||३||
आरती तुकारामाची
आरती तुकारामा | स्वामी सद्गुरुधामा | सच्चीदानंद मूर्ति | पाय दाखवी आम्हां ||१||
आरती तुकारामा ||धृ||
राघवें सागरांत | पाषाण तारियेलें | तैसें तुकोबाचे | अभंग रक्षीयेले ||२||
तुकितां तुलनेसी | ब्रह्मा तुकासी आले | म्हणोनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविलें ||३||