लसूण (Garlic) औषधी गुणधर्म : लसूण हा आपल्या चांगला परिचयाचा आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप गुणकारी आहे. लसणाच्या वापरामुळे आपल्या भाजीला व आमटीला छान चव येते. लसूणा पासून चटणी बनवली जाते. त्या चटणीने आपल्या तोंडाला चव येते व जेवण करावेसे वाटते. म्हणून आजारी माणसाला तोंडाला चव येण्यासाठी लसूण चटणी मुद्दामुन देतात.
लसूण हा तिखट, सूज, पक्षघात, संधीवात, हृदयरोग व फुफुसाच्या आजारावर खूप गुणकारी आहे. लसुणाच्या सेवनाने रक्तातील घट्ट पणा दूर होतो. तसेच लसुणाच्या सेवनाने आवाजत सुधारणा होते. व दंतरोग दूर होतो.
लसुणामध्ये कॅल्शियम, पोटँशीयम, फाँस्फरस, तसेच जीवनसत्व, “बी”, “सी” आहे. तसेच लसणामध्ये असलेले Antiseptic गुण आहे त्यामुळे Bacteria चे जंतू नष्ट करण्यास मद्त करते. थंडीमध्ये लसूण सेवन केल्याने शरीर बलवान व निरोगी होते. लसणामध्ये असणारे सल्फाईड द्रव्य त्वचा, फुफुसे व मूत्रपिंडाद्वारे बाहेर निघून जाते. लसूण हा पौस्टिक गरम आहे. जुलाबात गुणकारी आहे. स्त्रियाना लसूण हा खूप गुणकारी आहे.
लसुणामध्ये फुप्फुसाचा क्षय, गंडमाळ, व जखमेवर खूप गुणकारी आहे.तसेच ते एक जंतुनाशक आहे. जे नियमित लसणाचे सेवन करतात त्यांना क्वचितच क्षय रोग होतो. डांग्या खोकलावर लसूण गुणकारी आहे. लसणाच्या सेवनाने श्वासनळीत भरलेला कफ मोकळा होऊन बाहेर पडतो व कफातील जंतू पण नष्ट होतात. लसुनाच्या च्या सेवनाने मूत्रपिंडाना उतेजन मिळते लघवीचे प्रमाण वाढते.
टीप : लसूण व दुध बरोबर किंवा एकाच वेळेस घेवू नये. कारण की लसूण व दुध हा विरुद्ध आहार आहे.
लसूण हा उष्ण आहे त्यामुळे थंडी मध्ये त्याचे सेवन करावे. उन्हाळ्यात व त्याचे सेवन करी करावे कारण त्यामुळे पिक्त होऊ शकते. व शरीरावर छोटी-छोटी गळवे होऊ शकतात.
लसूण, मीठ, कोथंबीर, बेदाणा व साखर घालून चटणी बनवली असता व तिचं सेवन केले असता अरुची दूर होवून अन्न पचण्यास मदत होते.
उडदाच्या वड्यात लसूण घालून वडे तळून खाल्याने लकवा बरा होतो असे म्हणतात.
लसूण, पुदिना, जिरे, धने, मिरे व मीठ मिक्स करून त्याची चटणी सेवन केल्याने वाढलेल्या रक्त दाबाचे प्रमाण कमी होते.
लसूण, ओला नारळ, मीठ, लाल मिरची पावडर व लिंबू घालून बनवलेला चटणी खूप छान लागते.
असा आहे लसूण गुणकारी त्याच्या सेवनाने आपल्या शरीराला खूप फायदा होतो.