स्वीट कॉर्न उसळ/ भेळ (Sweet Corn Usal) : ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. स्वीट कॉर्नचे दाणे हे चवीला मधुर व गोड असतात. हा पदार्थ पौस्टिक तर आहेच तसेच मुलांना डब्यात द्यायला पण चांगला व लवकर होणारा आहे. मुले हा पदार्थ आवडीने खातात. महाराष्ट्रात मधु मका हा खूप प्रसिद्ध आहे. मधु मका म्हणजेच स्वीट कॉर्न म्हणतात. मधुमक्याची भेळ किंवा उसळ ही महाराष्ट्रातील लोकांची आवडती डीश आहे.
The Marathi language video of this Sweet Corn Usal Or Bhel can be seen on our YouTube Channel: Tasty Sweet Corn Usal Or Bhel For Kids
स्वीट कॉर्न उसळ/ भेळ बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप मधु मका दाणे (sweet corn niblets)
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ छोटा टोमाटो (बारीक चिरून)
१/४ टी स्पून मिरे पावडर
१/४ टी स्पून चाट मसाला
१ छोटे लिंबू रस
१ टे स्पून बटर
मीठ चवीने
कृती :
मक्याचे दाणे थोडे उकडून घ्यावे. (म्हणजे कुकर मध्ये एक शिट्टी काढावी).
कांदा, टोमाटो, कोथंबीर बारीक चिरून घ्यावी.
एका कढई मध्ये बटर गरम करून कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेले मक्याचे दाणे, कोथंबीर, मीठ, लिंबू रस, मिरे पावडर, चाट मसाला, टोमाटो घालून मिक्स करून घ्यावे.
गरम गरम सर्व्ह केले तर छान लागते. सर्व्ह करतांना मक्याच्या दाण्यावर कांदा, टोमाटोने सजवावे. वरतून मिरे पावडर, चाट मसाला भूर भुरावा.