आळूच्या वड्या : आळूच्या वड्या ही एक महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय साईड डीश आहे. ह्या वड्यामध्ये आले-लसून, धने-जिरे पावडर घातली आहे त्यामुळे ह्याची चव खमंग लागते. चिंच व गुळ घातल्यामुळे आंबटगोड लागते. तांदळ्याच्या पीठीमुळे तळताना छान कुरकुरीत होतात. आळूची पाने खूप मोठी असतील तर एका पानाचे दोन तुकडे करावेत.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: १२-१५ वड्या
साहित्य :
४ मोठी अळूची पान
१ १/२ वाट्या बेसन
१ टे स्पून तांदूळ पिठी
२ टे स्पून चिंच कोळ
२ टे स्पून गुळ(चिरून)
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
मीठ चवीने
१ टे स्पून तीळ
तळण्यासाठी तेल
कृती : आळूची पाने धुवून घ्या. चिंच, गुळ मिक्स करून त्यामध्ये त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, धने-जिरे पावडर, आल-लसून पेस्ट, मीठ घालून मिक्स करून बेसन व तांदूळ पिठी व थोडेसे पाणी घालून मिश्रण बनवून घ्या. (मिश्रण पातळ नसावे. थोडे घट्ट असावे.) शेवटी १ टीस्पून तेल घालून मिक्स करावे.
आळूचे पान उलट ठेवून त्यावर बेसनचे मिश्रण लावावे. (मिश्रण असे लावावे की चारही पानांना पुरेल एव्ह्डे) नंतर त्यापानावर दुसरे पान उलट करून ठेवावे त्याला सुद्धा मिश्रण लावावे अशी चारही पाने एकावर एक ठेवून घ्यावी. मग बाजूनी थोडी मुडपून घ्यावी म्हणजे गुंडाळी करतांना मिश्रण बाहेर येणार नाही. बाजूनी मुडपल्यावर पानीची घट्ट गोल गुंडाळी करावी.
चाळणीला तेलाचा हं लावून त्यामध्ये आळूची गुंडाळी ठेवावी. मग मोदक पत्रात थोडे पाणी घालून त्यावर ही चाळणी ठेवून झाकण ठेवावे व १० मिनिट वाड्या उकडून घ्याव्यात. थंड झाल्यावर पातळ वाड्या कापाव्यात.
कढई मध्ये तेल गरम करून वड्या छान कुरकुरीत तळून घ्याव्यात.
टीप : आळूच्या वड्या करतांना पाने कोवळी काळ्या देठाची घ्यावीत.
आले-लसून जर खायचे नसेल तर नाही घातले तरी वड्या छान लागतात.
जर चार पानांची एक मोठी वडी नसेल बनवायची तर दोन-दोन पाने घेवून दोन वळकटी बनवाव्यात.
वाड्या तेलकट आवडत नसतील तर तव्यावर थोडे थोडे तेल घालून वड्या फ्राय करून घाव्यात.