पावाची उसळ (Bread Upma – Usal) : पावाची उसळ ही एक नाश्ता साठी डीश आहे. ही उसळ छान मसालेदार लागते. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला चांगली आहे. पावाला फोडणी देवून लिंबू, साखर घालून छान लागते. ही डीश संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा करता येते. पावाच्या उसळीला पावाचा चिवडा, पावाचे पोहे किंवा पावाचा उपमा सुद्धा म्हणतात. ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय डीश आहे.
पावाची उसळ अथवा उपमा बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य
६ ब्रेड स्लाईस
१ छोटा कांदा
१ छोटा बटाटा (उकडून, सोलून, तुकडे)
२ हिरव्या मिरच्या (तुकडे)
१ छोटे लिंबू रस
१ टी स्पून साखर
२ टे स्पून नारळ (खोवून)
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
मीठ चवीने
फोडणी करीता
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
५-६ कडीपत्ता पाने
१/४ टी स्पून हळद
कृती :
ब्रड स्लाईस चे छोटे-छोटे तुकडे करून घ्या व त्यावर लिंबू रस, साखर घालून मिक्स करा.
एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, कांदा व हिरव्या मिरच्या घालून दोन मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद व मीठ (थोडेसे) मिक्स करा व ब्रेडचे तुकडे, कोथंबीर व नारळ घालून मिक्स करून दोन-तीन मिनिट परतून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून खोवलेला नारळ व कोथंबीरीने सजवा.
टीप : उकडलेल्या बटाट्या आयवजी मटार वापरले तरी छान लागतात.
The English language version of the Bread Upma recipe can be seen in the article – Here