चीज पिझा विथ शिमला मिर्च कोबी टाँपिंग : पिझा म्हंटले की लहान मुले अगदी खुश होतात. लहान मुलेच काय मोठे सुद्धा खूष होतात. ह्यामध्ये मुख्य म्हणजे चीज आहे. चीज किती पौस्टिक आहे ते आपल्याला माहीत आहेच. तसेच ह्यामध्ये कोबी व शिमला मिर्च आहे त्यामुळे टाँपिंग दिसायला फार सुंदर दिसते. टोमाटो केचप मुळे चव पण छान येते. आपल्या घरी लहान मुलांनच्या वाढदिवसाच्या पार्टीला करायला छान आहे.
The English language version of the same Pizza Dish can be seen in the article – Here
साहित्य : ३ पिझ्झा बेस, ३ टे स्पून चीज (किसून), ३ टे स्पून टोमाटो केचप, १ टे स्पून बटर
पांढरा सॉस करण्यासाठी : १ टी स्पून बटर, १ टे स्पून मैदा, १ कप दुध, १ टे स्पून चीज (किसून), १/२ टी स्पून मिरे पावडर, मीठ चवीने
टाँपिंग साठी : १ छोटी शिमला मिर्च (उभे पातळ काप), १ कप कोबी (बारीक चिरून)१ कप टोमाटो (बारीक चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), १ टी स्पून लसूण (बारीक चिरून), १ टे स्पून बटर, १ टी स्पून मिरे पावडर, मीठ चवीने
कृती : पांढरा सॉस करण्यासाठी : एका फ्राईग पँनमध्ये बटर गरम करून मैदा मिक्स करून दोन मिनिट मंद विस्तवावर फ्राय करून घ्या. मग त्यामध्ये हळू-हळू दुध मिक्स करा पण गुठळी होता कामा नये. नंतर त्यामध्ये मीठ, चीज, व मिरे पावडर घालून मिक्स करा.
टाँपिंग साठी : फ्राईग पँन मध्ये बटर गरम करून कांदा, टोमाटो व लसूण थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये शिमला मिर्च, चिरलेला कोबी, २-३ मिनिट परतून घेवून त्यामध्ये मीठ, मिरे पावडर घालून मिक्स करा.
पिझा बेस घेवून त्याला आतल्या बाजूनी टोमाटो केचप लावून त्यावर एक टे स्पून पांढरा सॉस लावून त्यावर एक टे स्पून टाँपिंगचे मिश्रण लावावे व वरतून एक टे स्पून किसलेले चीज पसरवावे.
एका माईक्रोवेव्ह नाँन स्टिक प्लेटला एक टी स्पून बटर लावून त्यावर पिझ्झा बेस ठेवावा.
माईक्रोवेव्ह आगोदर गरम करून घ्यावा मग पीझाची प्लेट आत मध्ये ठेवून १५-२० मिनिटे बेक करून घ्या.
गरम गरम सर्व्ह करा.