चिकन कबाब : कबाब म्हंटले की तोंडाला पाणी सुटते. हे कबाब बनवायला अगदी सोपे आहेत. कबाब हा पदार्थ आपण लहान मुलांच्या पार्टी साठी किवा स्टारटर म्हणून सुधा बनवू शकतो. ह्यामध्ये सोय सोसं वापरलेला आहे त्यामुळे त्याला थोडी चायनीज टेस्ट आली आहे म्हणून त्याची चव पण चांगली लागते. ह्यामध्ये चिकन व अंडे आहे त्यामुळे पौस्टिक तर आहेतच. तळल्यामुळे कुरकुरीत तर लागतातच
चिकन कबाब बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १२ कबाब
साहीत्य
२ मोठे चिकनचे तुकडे (बोनलेस)
४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून)
१ मोठा चमचा आले- लसून – हिरवी मिरची पेस्ट
२ मोठे चमचे कोथंबीर चिरून
१ मोठा चमचा सोया सॉस
मीठ चवीनुसार
२ ब्रेडचे स्लाइस (मिक्सर मधून काढून)
१ अंडे (फेटून)
४ टोस्टची पावडर
तेल तळण्यासाठी
कृती
प्रथम चिकनचे तुकडे धुऊन घ्या. एका भांड्यात चिकनचे तुकडे बुडेल इतके पाणी व चिकन टाकून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शीजुद्या (पाणी आटले पाहिजे) नंतर त्यामध्ये सोया सॉस टाकून २ मिनिट शीजुद्या. थंड झाल्यावर त्याचे लांबट आकाराचे तुकडे करा.
उकडलेले बटाटे सोलून कीसून त्यामध्ये आले-लसून-मिरची पेस्ट, मीठ, कोथंबीर, ब्रेडक्रम व चिकनचे तुकडे घालून एक सारखे करून घ्या व त्याचे मध्यम आकाराचे चपटे गोळे करून ठेवा.
तेल तापवून घ्या. अंडे फेटून घ्या व चिकनचे गोळे एक एक करून फेटलेल्या अंडया मध्ये बुडवून मग टोस्टच्या पावडर मध्ये घोळून मग गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम कबाब टोमाटो सॉस बरोबर द्या.