चिकू हलवा : चिकू हलवा ही एक स्वादीस्ट स्वीट डीश आहे. चिकू हलवा ही डीश तुम्ही सणाला, पार्टीला किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. हलवा हा पिकलेल्या चिकूपासून बनवायचा. कारण पिकलेला चिकू गोड व स्वादीस्ट चिकू खाल्याने शरीरात एक प्रकारचा उत्साह येतो व आपण ताजे तवाने होतो. चिकू खूप थंड, पिक्तशामक, पौस्टीक, गोड असतात. जेवल्यावर नेहमी चिकू खावा तो फायदेशीर आहे, महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात असा समज आहे की ताप आल्यावर चिकू खावा हा एक रामबाण उपाय आहे.
चिकू हलवा ह्या मध्ये खवा मिक्स केल्यामुळे एक वेगळीच चव लागते.
चिकू हलवा बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
The English language version of the Chickoo Halwa recipe is given in the article – Here
साहित्य :
२ कप चिकूचा पल्प
१ १/२ कप साखर
१ कप खवा
१/४ कप काजू (तुकडे करून)
थोडे आखे काजू
१/२ टी स्पून वेलचीपूड
कृती : एका कढई मध्ये चिकू व साखर मिक्स करून मंद विस्तवावर आटवायला ठेवा व मधून मधून सारखे हलवत रहा. मिश्रण अगदी घट्ट झाले पाहिजे. मग त्यामध्ये खवा व काजूचे तुकडे घालून मिक्स करून परत मंद विस्तवावर हलवत रहा. नंतर त्यामध्ये वेलचीपूड मिस्क करून थंड करायला ठेवा.
काजू घालून डेकोरेट करा.