कॉर्न टोमाटो सलाड : कॉर्न टोमाटो सलाड हे एक छान वेगळे सलाड आहे. ह्यामध्ये स्वीट कॉर्नचे उकडलेले दाणे घातल्यामुळे वेगळीच चव लागते. अननसाचे घातल्यामुळे छान आंबटगोड लागते. लिंबू घातल्यामुळे पण चांगली चव येते.
साहित्य :
१ कप टोमाटो
१/२ कप स्वीट कॉर्न दाणे
१/२ कप पिवळी सिमला मिर्च
१/२ कप हिरवी सिमला मिर्च
१/२ कप अननस तुकडे
२ हिरवी मिरची (बारीक तुकडे करून)
१ टे स्पून लिंबू रस
सजावटीसाठी
१/२ टी स्पून काळी मिरी (जाडसर कुटून)
१०-१२ पुदिना पाने
कृती :
स्वीट कॉर्नचे दाणे उकडून घ्या, टोमाटोच्या बिया काढून त्याचे १/२” तुकडे करा, सिमला मिर्च १/२” तुकडे करून घ्या, अननसाची साले काढून त्याचे १/२” तुकडे करा.
एका मोठ्या बाऊल मध्ये स्वीट कॉर्नचे शिजवलेले दाणे, चिरलेली सिमला मिर्च, अननसाचे तुकडे, हिरवी मिरचीचे बारीक तुकडे व लिंबू रस घालून मिक्स करा नंतर मिरे पावडर, व पुदिना पाने घालून सजवा.
सलाड तयार झाल्यावर एका डेकोरेटीव्ह प्लेट मध्ये काढून थंड करून मग सर्व्ह करा.